सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या हत्येचा निषेधार्थ चिखलीत सकल राजपूत समाजाच्या वतीने मुक मोर्चा!
Dec 8, 2023, 20:26 IST
चिखली( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची दोन दिवसाआधी जयपूर येथील त्यांच्या निवासस्थानी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी आज,८ डिसेंबर रोजी चिखलीत सकल राजपूत समाजाच्या वतीने मुक मोर्चा काढण्यात आला.
८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता हिंदूसूर्य महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाजवळून मुक मोर्चाला सुरुवात करण्यात आली. हा मुक मोर्चा शहरातील मुख्य मार्गाने तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी सकल राजपूत समाजाच्या वतीने तहसीलदार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, राज्यपाल राजस्थान, गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, मंगळवार ५ डिसेंबर २०२३ रोजी भर दिवसा घरामध्ये प्रवेश करून राष्ट्रीय राजपूत करणी सेना सुप्रीमो स्व. सुखदेवसिंहजी शेखावत (गोगामेडी) यांची हत्या जयपुर राजस्थान येथील त्यांच्या राहत्या घरी गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. संदर्भात ६डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता चिखली शहर व परिसरातील सकल राजपूत हिंदू समाज संघटने सोबत एकत्र येऊन जाहीर निषेध करण्यात आला. तसेच आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी बाबत तीव्र भावना व्यक्त केल्या आहे. सुखदेवसिंह शेखावत (गोगामेडी) यांच्यावर झालेल्या हत्येबाबत अपराध्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या मुक मोर्चात डॉ. प्रतापसिंह राजपूत, शिवदास राजपूत, किशोर सोलंकी, अनिलसिंह चौहान, सागर इंगळे, यांच्यासह असंख्य सकल राजपूत समाजबांधव सहभागी झाले होते.