निवेदन द्यायला गेलेल्या सकल मराठा व पत्रकारांना एसपीकंडून अपमानास्पद वागणूक! वाचा एसपी कार्यालयात झालं काय?

(जाहिरात👆)
शांततेत आंदोलन असे करावे याचा परिपाठात सकल मराठा समाजाने दिला आहे. संपूर्ण जगाने दखल घ्यावी असे शांतता मोर्चे सर्वांनी पाहिले. सामाजिक प्रश्न असेल तिथे समाज बांधव निवेदन देऊन न्यायाची मागणी करतात आणि अशी करत असेल तर ही बाब गैर ठरत नाही. आज दिनांक १ मार्च रोजी सकल मराठा समाजाने शहरातील कॅफे संदर्भात निवेदन दिले. शहरातील कॅफेवर कॅफेच्या नावाखाली मुला मुलींचे गैरप्रकार वाढले असून मुलींना मोह पाशात ओढण्यासाठी कॅफेचा वापर होत असल्याचे बाब पुढे आणली. कॅफेमध्ये पलंग व केबिन असल्याचे बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली. यासंदर्भात निवेदन देण्यासाठी शिष्टमंडळ गेले असता एसपी सारंग आवाड यांनी जिल्ह्यातील मोठ्या समूहाच्या भावना समजून घेण्याऐवजी आवाज चढवीत प्रश्नांची सरबत्ती केली.
अन एस पी आले केबिन बाहेर-
पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात निवेदन देण्यासाठी निवेदनकर्ते गेले असता शिपाई निरोप घेऊन जातो मात्र आज शिष्टमंडळ गेले असता एस पी स्वतःच केबिन बाहेर आले व काय लावले ?ठाणेदराला भेटले का? डीवायएसपी ला भेटले का? असे प्रश्न विचारू लागले. निवेदन देणे अपराध वा दखलपात्र गुन्हा ठरत नाही. मात्र एसपींच्या बोलण्याचा भाव पाहता सर्व स्तंभित झाले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या फोनने गणित बिघडले-
बुलडाणा शहर सुसंस्कृत शहर आहे. इथे असे प्रकार होणे मला तरी आवडले नाही असे म्हणत जिल्हाधिकारी तूम्मोड यांनी पोलीस अधीक्षकांना फोन लावला. निवेदन कर्ते व पत्रकार यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षातच हजर होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांचे काही 'मार्मिक' शब्द वर्मी लागले अशी चर्चा आहे.
मराठा समाजाची दुसरी घटना
सिंदखेड राजा येथे १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सव साजरा होतो. येथे पोलिसांना दंगल घडवायची होती. यासाठी जिजाऊ भक्तांना डीवचण्यात आले असा गंभीर आरोप पुरुषोत्तम खेडेकर यांनी यापूर्वीच केला आहे. तर आज सकल मराठा समाजाला उद्धट वागणूक देण्यात आली.शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांवर लाठिचार्ज ची घटना राज्यभर गाजत आहे व आज सकल मराठा व पत्रकारांना दिलेल्या भूमिकेवरून देखील प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. शांत संयमी जिल्ह्यात यामुळे संतप्त भावना आहे. जिल्हात सर्वत्र अवैध धंदे सुरू आहे .कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न आहे. मात्र पोलीस अधीक्षक निवेदन देण्यासाठी आलेल्या लोकांनाच प्रश्न विचारू लागले आहे.