संतनगरी दुमदुमली! राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांसह ११०० दिंड्या शेगावात दाखल! "श्रीं"च्या समाधी दर्शनासाठी किती तास लागतात ते वाचा...

 
shegao

शेगाव( ज्ञानेश्वर ताकोते: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): श्री.संत गजानन महाराजांचा १४५ वा प्रगट दिन आज ,१३ फेब्रुवारीला मोठ्या उत्साहात साजरा होतोय. संतनगरी शेगावात कालपासून लाखो भाविक "श्रीं" च्या दर्शनासाठी दाखल झाले आहेत. याशिवाय ११०० दिंड्या सुद्धा शेगावात दाखल झाल्या आहेत. संस्थानच्या वतीने भाविकांची चोख व्यवस्था करण्यात आली असून पोलीस प्रशासनाच्या वतीने सुद्धा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

  sagvan

            (जाहिरात👆)

दर्शनासाठी रात्रीपासून मंदिर खुले ठेवण्यात आले होते. आज, पहाटे ५ ला काकड आरती घेण्यात आली. सकाळी ७ वाजता मुख्य आरती घेण्यात आली. मुख दर्शन आणि समाधी दर्शनासाठी वेगवेगळ्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत. मुख दर्शनासाठी सध्या ४५ मिनिट ते १ तासांचा कालावधी लागत असून मुख्य समाधी दर्शनासाठी साडेतीन ते ४ तास लागत आहेत. दुपार नंतर दर्शनासाठी भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सकाळी ८ वाजेपासून महाप्रसादाचे वितरण संस्थांनच्या वतीने सुरू करण्यात आले आहे.