संत मुक्ताबाईंच्या पालखीचे जिल्ह्यात आगमन! कृषी मित्र सचिन बोंद्रे आणि स्वप्निल गुप्तांच्या बैलजोडीला पालखी वहनाचा मान! आजचा मुक्काम चिखलीत

 
Hdjd
चिखली(गणेश धुंदळे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) श्री.संत मुक्ताबाईंच्या पालखीचे काल,५ जूनच्या दुपारी जिल्ह्यात आगमन झाले. सामाजिक, धार्मिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे कृषी मित्र सचिन बोंद्रे, चिखली येथील व्यवसायिक स्वप्नील गुप्ता यांनी पालखीचे जिल्ह्यात स्वागत केले. सचिन बोंद्रे आणि स्वप्निल गुप्तांच्या बैलजोडीला श्री.संत मुक्ताबाईंच्या पालखीच्या वहनाचा मान मिळाला आहे.

रणरणत्या उन्हात पालखी मार्गक्रमण करीत असली तरी विठुरायाच्या भेटीच्या ओढीने उन सुद्धा वारकऱ्यांना सुसह्य होत आहे, याचा अनुभव कृषी मित्र सचिन बोंद्रे यांनी पालखीत सहभागी होऊन घेतला. काल जिल्ह्यात दाखल झालेल्या श्री. संत मुक्ताबाईंच्या पालखीचा आजचा मुक्काम चिखलीत आहे. उद्या पालखी चिखलीवरून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होईल. जिल्ह्यातील प्रवासदरम्यान सचिन बोंद्रे आणि स्वप्निल गुप्ता यांच्या पालखीला संत मुक्ताबाईंच्या पालखीच्या मान मिळाला आहे. चिखली येथील रेणुका माता वहन मिरवणुकीतदेखील सचिन बोंद्रे आणि स्वप्निल गुप्तांच्या बैलजोडीला वहनाचा मान आहे.


आम्ही पालखीचे भोई : कृषीमित्र सचिन बोंद्रे.!

 विठुरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रातून शेकडो वारकरी पैदल वारीने जातात. दरवर्षी श्री संत मुक्ताबाईंच्या पालखीच्या स्वागताचे, दर्शनाचे आणि सेवेचे भाग्य लाभणे ही आमच्यासाठी भाग्याची बाब आहे.  श्री.संत मुक्ताबाईंच्या पालखीचे भोई होता येणे यासारखा आनंदाचा क्षण नाही अशी प्रतिक्रिया सचिन बोंद्रे यांनी दिली.