दहीहंडी उत्सवात दुःखद घटना! गॅलरी कोसळून चिमुकली ठार; एक गंभीर

 
jrkfhg
देऊळगावराजा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात काल दहीहंडी उत्सव सगळीकडे उत्साहात साजरा झाला..मात्र देऊळगाव राजा शहरात घडलेल्या एका घटनेने समजनमन हळहळले आहे. दहीहंडी उत्सवात बांधलेल्या दोरीने गॅलरी कोसळल्याने दहीहंडी पाहत उभी असलेली चिमुकली जागीच ठार झाली. चिमुकलीचे वय केवळ ९ वर्षाचे आहे.
 

प्राप्त माहितीनुसार काल,सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास देऊळगावराजा शहरातील मानसिंगपुरा भागात ही घटना घडली. दहीहंडी साठी एका बंद अवस्थेत असलेल्या घराच्या गॅलरीला दोरी बांधण्यात आली होती.  दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा या दोरीला लटकला तेव्हा ताण पडल्याने सिमेंट पिलरसह गॅलरी कोसळली. खाली उभे राहून दहीहंडी पाहणाऱ्या निशा रशीद खान पठाण (९) या चिमुकलीच्या अंगावर दहीहंडी कोसळल्याने ती जागीच ठार झाली. याच दुर्घटनेत अल्फिया शेख हाफिज ही ८ वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली आहे, तिच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. मृतक व जखमींना शासनाकडून तातडीने मदत मिळवून देण्यात येणार असल्याचे डॉ.शिंगणे यांनी म्हटले आहे.