बुलडाण्यात तलवारीने निर्घृण खून झाल्याची अफवा..प्रत्यक्षात नेमक काय झालं कांड....वाचा...

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाण्यात ७ जानेवारीच्या सायंकाळी चांगलाच राडा झाला..आपसातील वादातून सपासप चाकू चालला...मराठा हॉटेल समोर ही घटना घडली..दरम्यान त्याचवेळी काही व्हॉट्स ॲप ग्रुप वर मराठा हॉटेल समोर तलवारीने निर्घृण खून झाल्याची पोस्ट पसरली होती..मात्र नंतर ती अफवा असल्याचे समोर आले..याप्रकरणी बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात ३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे...चिखली येथील मंगेश रमेश वानखेडे (३५) यांनी याप्रकरणाची तक्रार दिली आहे.
Mla
                           जाहिरात 👆
मंगेश रमेश वानखेडे (३५) या झटापटीत जखमी झाले असून त्यांच्यावर चिखलीच्या जवंजाळ हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू आहेत. मंगेश वानखेडे बुलडाणा येथे खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करीत होते. सुंदरखेड येथील राजू दगडु मोरे हा सुद्धा खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करतो.. दोघांत किरकोळ कारणावरून वाद झाले होते...तक्रारदार मंगेश वानखेडे ७ जानेवारीला मोटारसायकलची सर्व्हिसिंग करण्यासाठी बुलडाण्यात आले होते..त्यावेळी पुन्हा हा वाद उफाळून आला..
सायंकाळी ५ च्या सुमारास मंगेश वानखेडे चिखलीकडे परत जात असताना भगीरथ कारखान्यासमोर राजू दगडु मोरे, नितेश एकनाथ थिगळे, शे. जावेद व एक अनोळखी ईसम यांनी त्यांची स्विफ्ट डिझायर गाडी रस्त्यात आडवी लावली..माफी मागण्याच्या बहाण्याने त्यांनी मंगेश वानखेडे यांना मराठा हॉटेल पर्यंत आणले..मराठा हॉटेल समोर राजू मोरे याने स्विफ्ट डिझायर गाडीतून चाकू काढला व मारहाण केली.. नितेश थीगळे याने फायटरने मंगेश वानखेडे यांना मारहाण केली..तुला खतम करून टाकू अशी धमकी देत सर्व आरोपी स्विफ्ट डिझायर गाडीने पळून गेले..घटनेनंतर मंगेश वानखेडे यांना चिखली येथील जवंजाळ हॉस्पिटल मध्ये उपचारार्थ दाखल केले.. काल, बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात त्यांनी तक्रार दिली.याप्रकरणी राजू दगडु मोरे, नितेश एकनाथ थिगळे, शे.जावेद यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत...