सकल मराठा समाजाच्या वतीने दुसरबीड बंद ला उस्फुर्त प्रतिसाद! व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद ठेवली दुकाने

 
Jhfc
सिंदखेडराजा(बाळासाहेब भोसले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): दुसरबीड येथे सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने काल रविवारला व्यापारी मंडळाच्या वतीने सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली. या बंद ला उस्फुर्त प्रतिसाद देत दुसरबीड बस स्थानक चौकात रास्ता रोको आंदोलन करून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील घटनेचा निषेध नोंदविण्यात आला.
सकल मराठा समाजाच्या सर्व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून घोषणाबाजी केली व घटनेची सखोल चौकशी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी गजेंद्र देशमुख, गजानन आढाव, संदीप देशमुख, राजूभाऊ देशमुख, पांडुरंग मोहीते. गजानन जगताप ,गुणवंत देशमुख, अभिजित देशमुख, रंनधीर गायकवाड, प्रदीप शिंदे. दिलीप देशमुख, एकनाथ पवार ,पांडुरंग महाडिक, गौरव देशमुख, शाम जाधव, ज्ञानेश्वर कुलथे सह अनेक समाज बांधव हजर होते. यावेळी किनगाव राजा पोलिस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.