बुलडाणा शहरातील इंदिरा नगरचे रहिवाशी बसले बेमुदत उपोषणाला..! "या" आहेत मागण्या

 
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): शहरातील इंदिरा नगर येथील मुख्य रस्त्याचे अर्धवट काम तातडीने पुर्ण करावे, परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता करावी, सुरळीत पाणीपुरवठा करण्यासह इतर मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते समीर खान यांच्या नेतृत्वाखाली इंदिरा नगरमधील रहिवाशांनी मंगळवार, ३० जानेवारीपासून इंदिरा नगरच्या प्रवेशद्वाराजवळ बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
Add
जाहिरात 👆
निवेदनात म्हटले आहे की, इंदिरा नगरचा मुख्य रस्ता चांगला असतानाही केवळ आर्थिक फायद्याच्या उद्देशाने सदर सिमेंट काँक्रीटच्या रसत्यावर खडीकरण करण्यात आले. या रस्त्याच्या खडीकरणला जवळपास दोन ते तीन वर्षाचा कालावधी उलटुन ही सध्या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे, स्थानिक नागरिकांना वाहने चालवताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तसेच परिसरातील नाल्यांमध्ये घण-कचरा साचत असल्याने दूषित पाणी मुख्य रस्त्यावर व नागरिकांच्या घरात शिरत आहे़ त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून, त्याचा परिणाम होत आहे. इंदिरा नगर येथील वरील मूलभूत सुविधा पुरविण्याच्या मागणीबाबत प्रशासनाला गतवर्षी निवेदन देण्यात आले होते. मात्र मागणी केल्यानंतर काही दिवस परिसरात साफ-सफाई करण्यात आली़ इतर कामांकडे मात्र दुर्लक्ष करण्यात आले़ अखेर प्रशासनाच्या धोरणाला कंटाळून इंदिरा नगर येथील रहिवाशांनी समीर खान यांच्या नेतृत्वाखाली मुख्य रस्त्याचे अपूर्ण काम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी मंगळवार ३० जानेवारीपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. उपाेषणात शाकिर रज़ा, अकील शाह, शेख अलीम शेख, वाजिद, शैख़ अकरम, शेख अल्ताफ, शेख साहिल, युसूफ खान, शाहरुख़, मो वसीम, शेख समीर शेख चाँद, सय्यद सिराज शेख अयान, शेख मजाज आदींनी सहभाग घेतला आहे़