"आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं"! बुलडाण्यात भगव्या जनसागराकडून घोषणांचा पाऊस ! नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी...
Sep 13, 2023, 13:22 IST

बुलडाणा(बुलडाणा): बुलडाणा शहरातील मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे. जिजामाता प्रेक्षागर मैदानातून निघालेल्या हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. तिथे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देईल. त्यानंतर जयस्तंभ चौकात जाहीर सभा होईल.
मराठा क्रांती मोर्चाला भगवा जनसागर उसळला आहे. नजर जाईल तिथपर्यंत गर्दीच गर्दी आहे. "जय भवानी जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाच" अशा घोषणांनी बुलडाण्याचा आसमंत दणाणून निघत आहे.