नवा वाहन कायदा रद्द करा! लोणार मधून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांची थेट राष्ट्रपतींकडे मागणी!

 
Jdjj
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :केंद्राच्या नव्या मोटार वाहन कायद्या विरोधात संपूर्ण राज्यातील चालक प्रचंड आक्रमक झाले आहेत. चालक मालक संघासह आता राजकीय विरोधक सरकारवर निशाणा साधत आहे. केंद्राने नवा मोटार कायदा माघे घ्यावा अन्यथा सरकारला सळको की पळो केल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा बुलडाण्यातील ठाकरे गटाने आज २ डिसेंबरला दिला. यासंदर्भात मेहकर येथे तहसीलदारांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आले आहे.
चालकाच्या चुकीने जर अपघात घडला, व तो अपघातग्रस्तांना सोडून पसार झाला तर त्याला १० वर्षाचा कारावास वन १० लाख रुपयाचा दंड द्यावा लागले. अशी शिक्षा नव्या कायद्यात आखली आहे. सरकारच्या याच कायद्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलनाचे पडसाद उमटले आहेत.
बुलडाणा जिल्ह्यात देखील मोटार चालकांचे आक्रमक रूप पाहायला मिळाले, आज बुलडाण्यात चालकांनी रास्ता रोको आंदोलन केले. सरकार विरोधी जोरदार निदर्शने केल्याचे पाहायला मिळाले.. दरम्यान ठाकरे गटाकडून निवेदन देताना जिल्हा संघटक डॉ गोपाल बच्छिरे, तालुकाप्रमुख मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव, तानाजी अंभोरे इक्बाल कुरेशी, नंदकिशोर ,राठोड किरण कांबळे ,मच्छिंद्र अंभोरे यांच्यासह आदी उपस्थित होते.