बुलडाण्याच्या इक्बाल चौकातील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात; शनिवारी चिमुकल्याचा ट्रक खाली येऊन झाला होता दुर्दैवी मृत्यू ! अतिक्रमणामुळेच होत होती वाहतूक कोंडी.
Updated: Nov 21, 2023, 20:28 IST
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): बुलडाणा शहरातील इक्बाल चौक परिसरातील अतिक्रमित दुकाने नगरपरिषदेकडून आज,२१ नोव्हेंबरला उखाडण्यात आली. तीन जेसीबी, दोन ट्रॅक्टर एक अग्निक्षमक दलाचे वाहन आणि नगर प्रशासनाचे कर्मचारी सोबत पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवून प्रशासन इकबाल चौकातील अतिक्रमण हटवण्यात आले. उद्याहदेखील ही मोहीम राबविण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात येत आहे .
इक्बाल चौकातील चहू बाजूंवरील रस्त्यात असलेले मालवाहक लोडगाडी,प्रतिष्ठाने हटवण्यासाची प्रक्रिया सुरू झाली आहे. अतिक्रमित जागेवर येणाऱ्या भिंती सुद्धा जेसीबीच्या सहाय्याने उकडण्यात येत आहे. सदर कारवाईच्या वेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गणेश पांडे, ठाणेदार प्रल्हाद काटकर उपस्थित आहेत. याच परिसरात मागील शनिवारी आयशर ट्रकाच्या चाकाखाली येऊन दहा वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाला होता. रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वाहन अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होते, याच वाहतूक कोंडीमुळे शनिवारी अपघात होऊन चिमुकल्याचा बळी होता. एका बळीनंतर नगर परिषद प्रशासनाने आता ही बाब गांभीर्याने घेतली आहे...!