"त्या" शिक्षकाला सेवामुक्त करा! शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख जिजाताई राठोडांची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी...
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सिंदखेड राजा तालुक्यातील वर्दडी येथे जिल्हा परिषद शाळेतील मुलींचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. हा प्रकार संतापजनक असून शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या त्या शिक्षकाला सेवामुक्त करण्यात यावे अशी मागणी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख जिजाताई राठोड यांनी केली आहे. तसे पत्र त्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन दिले आहे.
खुशालराव उगले या शिक्षकाने शाळेतील विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केले होते. या शिक्षकाला सध्या अटक करण्यात आली आहे. समाजातील विविध क्षेत्रातून या प्रकारचा तीव्र निषेध नोंदविण्यात येत आहे. शिवसेना महिला आघाडीने नराधम शिक्षकाला सेवामुक्त करण्याची मागणी केली. निवेदनावर जिजाताई राठोड यांच्यासह सामाजिक कार्यकर्त्या शाही ना पठाण, सुनीता निकम, संगीता पवार यांच्या सह्या आहेत.