मदत व पुनर्वसनमंत्री ना.अनिल पाटील यांच्या हस्ते उद्या बुलडाण्यात ध्वजारोहन..!

 
Ap
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील आज,१४ ऑगस्टच्या संध्याकाळी बुलडाण्यात दाखल झाले आहेत.उद्या त्यांचे हस्ते सकाळी नऊला मुख्य ध्वजारोहण होणार आहे.
आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ते जिल्ह्यात दाखल झाले. बुलडाणा येथील शासकीय विश्रामगृहात त्यांचा मुक्काम असणार आहे. उद्या,१५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पोलीस ग्राउंड वरील मुख्य ध्वजारोहण ना.पाटील यांच्या हस्ते होणार आहे. उद्या दुपारी २ वाजता ना.पाटील अंमळनेरकडे रवाना होतील.