पाडळी व गिरडा येथे रविकांत तुपकरांचा जंगी सत्कार! रविकांत तुपकर म्हणाले, शेतकऱ्यांचे आशिर्वाद कायम बळ देतात.. ​​​​​​​

 
rt
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  शेतकऱ्यांसाठी आपण सातत्याने लढा देत आहे. जीव धोक्यात घालून अनेक आंदोलने आजवर केली आहेत. अनेक गुन्हे दाखल झाले, तडीपार व्हावे लागले, पोलिसांच्या लाठ्या - काठ्या झेलल्या, तुरुंगवास सोसला परंतु हा लढा सोडला नाही. आता गावोगावी होत असलेले स्वागत, सत्कार आणि त्यातून मिळणारे शेतकऱ्यांचे प्रेम आणि आशिर्वादच लढण्याचे कायम बळ देतात, असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केले.
 

 बुलडाणा तालुक्यातील पाडळी व गिरडा येथे १८ जून रोजी रविकांत तुपकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. आंदोलनामुळे शेतकऱ्यांना पिकविमा व अतिवृष्टीची मोठया प्रमाणात मदत मिळाल्याने शेतकऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला. ढोल-ताशाच्या गजरात, फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी करत रविकांत तुपकर यांचे गावात जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी महिलांनी औक्षण केले. त्यानंतर सत्कार समारंभ पार पडला. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांना पिकविमा आणि अतिवृष्टीची मदत मिळाल्याने शेतकरी सुखावले आहेत. त्यामुळे गावोगावी तुपकरांच्या सत्काराचे आयोजन केले जात आहे. विशेष म्हणजे या सत्काराच्या नियोजनात तरुणांचा मोठा पुढाकार दिसून येत आहे. गिरडा आणि पाडळी या दोन गावांमध्येही तुरुणांचा पुढाकार दिसून आला. गावकऱ्यांनी माझ्यावरील प्रेमापोटी केलेला हा ह्रदय सत्कार माझ्या सदैव स्मरणात राहील, शेतकऱ्यांचे हे प्रेम, आशिर्वादच मला लढण्याचे बळ देतात, असे प्रतिपादन यावेळी रविकांत तुपकर यांनी केले.