BIG BREKING पोलीस बंदोबस्तात रविकांत तुपकरांना न्यायालयात आणले!जिल्हा न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवला! न्यायालयाच्या निर्णयाकडे साऱ्यांच्या नजरा
Feb 12, 2023, 15:44 IST

बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना आत्मदहन आंदोलनादरम्यान काल पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्यासह २५ जणांना अटक करण्यात आली असून त्यांनी चिखली पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते.
आज,१२ फेब्रुवारीला साडेतीनच्या सुमारास त्यांना व त्यांच्या साथीदारांना बुलडाणा जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले आहे. त्यामुळे न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. न्यायालयाचा निर्णय काय येतो याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.