राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्गाचा आज समारोप! चिखलीच्या तालुका क्रीडा संकुलाच्या मैदानात सायंकाळी प्रकट कार्यक्रम!

प्रांत सहसंघाचालक श्रीधरराव गाडके करणार उद्बोधन;स्वामी हरीचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज प्रमुख अतिथी
 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विदर्भ प्रांताचा प्रथम वर्ष संघ शिक्षा वर्ग १७ मे पासून चिखली येथील आदर्श विद्यालयात सुरू आहे. विदर्भ प्रांतातील ४०० पेक्षा अधिक शिक्षार्थी वर्गात प्रशिक्षण घेत आहेत. या वर्गाचा जाहीर समारोप आज,१ जून रोजी सायंकाळी होणार आहे. चिखली येथील तालुका क्रीडा संकुलाच्या आहे मैदानात होणाऱ्या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विदर्भ प्रांताचे सहसंघचालक श्रीधररावजी गाडगे यांचे प्रमुख उद्बोधन होणार आहे. स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून त्यांचेही आशीर्वचन लागणार आहे. सायंकाळी ठीक ६:३० वाजता या कार्यक्रमाला प्रारंभ होणार असून १५ मिनिटे आधीच नागरिकांनी आपले स्थान ग्रहण करावे असे आवाहन वर्गाचे सर्वाधिकारी, तथा नागपूर महानगर संघचालक राजेशजी लोया, चिखली तालुका संघचालक शरद भाला, चिखली नगर कार्यवाह मिलिंद हिवाळे यांनी केले आहे.