भगवा जाणीव आंदोलनातून फुंकणार रणसिंग! शिवनेरीवर भगवा लावण्यासाठी लवकरच आंदोलन खा. अमोल कोल्हे करणार आंदोलन!

सार्वजनिक शिवजयंती उत्सवाचे उद्घाटन १७ फेब्रुवारी रोजीअभिनेते व खा. अमोल कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चिंचोले हॉस्पिटल येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी भगवा जाणीव आंदोलनावर भाष्य केले.
पुढे बोलताना खा.अमोल कोल्हे म्हणाले की, इंग्रजांनी काही कायदे आणले. त्याकाळी त्यांनी आणलेले कायदे इंग्रज गेल्यानंतर आजही तसेच पाळले जात आहे. पुरातत्त्व विभागाच्या माध्यमातून शिवप्रेमींच्या अस्मितांवर घाला घातल्या जात आहे. शिवनेरी किल्ला आमची अस्मिता आहे. महाराजांचा जन्म येथे झाला. छत्रपती शिवाजी महाराज सर्वांसाठी राजकारण, धर्मकारणाच्या पलीकडचे व्यक्तिमत्व आहे. शिवनेरीवर त्यांच्या जन्मस्थळी मोठा भगवा ध्वज असावा हे तमाम शिवप्रेमी चे स्वप्न आहे. मात्र या ठिकाणी भगवा लावू दिल्या जात नाही. यासाठी आपण शासनाचे वारंवार लक्ष वेधले. सन २०२१ पासून आमचा संघर्ष सुरू आहे. यासाठी संसदेतही आवाज उठविला. मात्र त्याला प्रतिसाद नसल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भगवा जाणीव आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनात राज्यातील शिवभक्तांनी पाठिंबा द्यावा असे आवाहन खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी केले
शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार
किल्ले शिवनेरीवर १९ फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव सोहळा साजरा होतो. मात्र सामान्य माणसाला या सोहळ्यात सहभागी होऊ दिले जात नाही. सामान्य व्यक्ती जो शिवरायांनी केंद्रबिंदू मांडला त्याला मज्जाव का केला जातो? असा सवाल करीत यंदा आपण सामान्य व्यक्तींसोबत खांद्यावर भगवा ध्वज घेऊन शिवनेरीवर जाणार असल्याचे खासदार अमोल कोल्हे म्हणाले. मात्र सर्व शासकीय कार्यक्रमावर बहिष्कार असेल असेही त्यांनी सांगितले
डॉ. शोन सच्चा शिवप्रेमी
बुलढाणा येथे शिवजयंती साजरी करताना महाराजांना अभिप्रेत कार्य समितीचे अध्यक्ष डॉ.शोन चिंचोले करीत आहे.अठरापगड जाती धर्माला जोडणारा विचार,कार्य याबद्दल खा. अमोल कोल्हे भरभरून बोलले. डॉक्टर शोन हे कृतीतून महाराजांचा वैचारिक वारसा पुढे चालवीत असल्याचे सांगून त्यांनी शिवजयंतीच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. संचलन पत्रकार गणेश निकम यांनी केले. यावेळी समिती सचिव सुनील सपकाळ, एडवोकेट जयसिंगराजे देशमुख यांच्यासह इतरांची उपस्थिती होती