राजू शेट्टी जिल्ह्यात येऊन गेले..! ठरला होता मोर्चा अन् झाली छोटी संवाद सभा; कार्यकर्त्यांची मोठी फळी तुपकरांच्याच गटात....
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज,६ ऑगस्टला जिल्ह्यात येऊन गेले. रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून अधिकृत हकालपट्टी केल्यानंतर शेट्टी पहिल्यांदाच बुलडाणा जिल्हा दौऱ्यावर होते. त्यामुळे शक्ती प्रदर्शन करून "तुपकर नसले तरी आमचे काही बिघडत नाही" असा मॅसेज देण्यासाठी ते शक्ती प्रदर्शन करतील असे वाटत होते..त्यादृष्टीने तसे प्रयत्नही त्यांच्या गटाकडून झाले, राजू शेट्टींच्या उपस्थितीत खामगावात भव्य मोर्चा काढायचा प्लॅनही झाला.. मात्र अपेक्षित गर्दी जमणार नाही याचा अंदाज आल्याने मोर्चा रद्द करून संवाद बैठक घेण्याचे ठरले..तशी संवाद बैठक घेऊन राजू शेट्टी जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात निघून गेले..एकंदरीत शेट्टी यांचा किंवा तुपकर विरोधकांचा आजचा शक्ती प्रदर्शनाचा प्लॅन फसल्याचे चित्र दिसले.जिल्ह्यातील शेतकरी चळवळीतील मोठी फळी आजही तुपकर यांच्याच बाजुला उभे असल्याचे यावरून दिसून आले..