बुलडाणा लाइव्हच्या आवाहनानंतर धावून आले राजश्री शाहू सोशल फाउंडेशन; उद्या जिल्हा सामान्य रुग्णालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन!

 
Hfj
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असल्याने सामाजिक क्षेत्रातील संघटनांनी पुढाकार घेवून रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असे आवाहन बुलडाणा लाइव्ह ने बातमीद्वारे केले होते. याच आवाहनाला प्रतिसाद देत संदीप शेळके यांच्या नेतृत्वात कार्यरत असलेले राजश्री शाहू सोशल फाउंडेशन धावून आले आहे. या सोशल फाउंडेशन तर्फे उद्या ४ मे, शनिवार रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता शिबिराला सुरुवात होणार आहे.
Advt
 मागील काही दिवसांत जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त केंद्रात रक्त साठा संपुष्टात आला होता. उन्हाळा आणि इतर कारणांमुळे रक्तदान शिबिराचे आयोजनही ठप्प झाले होते. रक्त केंद्रातून प्रति महिना सरासरी ३०० रक्तपिशव्या न्यू शुल्क रक्त संक्रमणासाठी उपलब्ध होतात. हे गोरगरीब रुग्णांसाठी अतिशय उपयुक्त ठरते. थॅलेसेमिया व सिकलसील रुग्णांना कायमस्वरूपी आणि अपघात झालेल्या व्यक्ती आणि गर्भवती स्त्रियांना आपातकालीन परिस्थितीत रक्ताची गरज असते. सामान्य रुग्णालयातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता बुलडाणा लाइव्हने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले होते. जिल्ह्यातील सर्व सामाजिक राजकीय शैक्षणिक आणि धार्मिक संघटना आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करावे असे आवाहन केले होते. दरम्यान आता यासाठी राजश्री शाहू सोशल फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. त्यांच्या तर्फे उद्या भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. राजश्री शाहू परिवार नेहमीच समाजपयोगी कार्यात अग्रेसर राहले आहे. उद्या होणाऱ्या रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन शाहू परिवाराचे वतीने करण्यात आलेले आहे.