राजपूत समाजबांधवांचे चिखली नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन! "या" आहेत महत्वाच्या मागण्या..! मान्य करा नाहीतर आंदोलन..
चिखली शहरातील हिंदुसूर्य महाराणा प्रताप मार्केट मध्ये असलेल्या हिंदुसूर्य महाराणा प्रताप स्मारकाजवळील अतिक्रमण हटवण्यात यावे. बस स्थानकाजवळील हॉटेल कामाक्षी समोरील काढून टाकण्यात आलेली हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह मार्केट ची कमान पुन्हा बसविण्यात यावी.शहरात राजपूत समाज बांधवांची लोकसंख्या पाहता समाज भवनाकरिता ओपन स्पेस उपलब्ध करून देण्यात यावा. नगरपरिषदेच्या हद्दवाढीत नव्याने समाविष्ट झालेल्या जालना रोड वरील सहारा पार्क, व्यास नगर या नवीन वस्तीचे हिंदुसूर्य महाराणा प्रतापसिंह असे नामकरण करण्यात यावे. तसे रामा ट्रॅक्टरच्या शोरूम च्या बाजूला हिंदू सूर्य महाराणा प्रताप सिंह नगर अशी नवीन कमान उभारण्यात यावी अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत.
निवेदन देतेवेळी शिवदास राजपूत, किशोर सोळंकी, ज्ञानेश्वर परिहार, स्वप्निल इंगळे,समाधान गाडेकर, हरिभाऊ परिहार, बद्री महाले, राजू सुरडकर, स्वप्निल सुरडकर, पंकज सुरडकर , ॲड सदार, राम जाधव, बिदेसिंग इंगळे, डॉ.उदय राजपूत, डॉ. पंढरी इंगळे, विशाल इंगळे, प्रमोद सपकाळ, अतुल सदार, गणेश इंगळे, नितीन राजपूत, रवी पवार, शिवाजी गाडेकर, सूरज सोळंकी, प्रताप सोळंकी, शिवदास सोळंकी, साहेबराव परिहार, गजानन सुरडकर, दिपक जाधव, कौतिकराव जाधव, राजेंद्रसिंग सुरडकर, गजानन भगवान परिहार यांच्यासह राजपूत समाज बांधवांची उपस्थिती होती.