राजर्षी शाहू सोशल फाउंडेशनच्या रक्तदान शिबिराला सुरुवात ; सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद!
May 4, 2024, 12:20 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता राजर्षी शाहू सोशल फाउंडेशनतर्फे आज शनिवार, ३ मे रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सामान्य रुग्णालयातील रक्त केंद्रात सकाळीच सुरू झालेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. शाहू परिवार तसेच वन बुलडाणा मिशनच्या अनेकांनी शिबिरात सहभाग घेतला आहे. वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी रक्तदात्यांचे गुलाबपुष्प देवून स्वागत केले व त्यांचा उत्साह वाढविला.
याआधी सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा असल्याची बातमी बुलडाणा लाइव्हने दिली होती. तसेच रक्तदान शिबिरासाठी सामाजिक क्षेत्रातील संघटनांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले होते. राजर्षी शाहू सोशल फाउंडेशच्या पुढाकारातून आज भव्य रक्तदान शिबिर संपन्न होत आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना संदीप शेळके म्हणाले की, राजर्षी शाहू फाउंडेशन तसेच वन बुलढाणा मिशन सदैव सामाजिक उपक्रमात अग्रेसर आहे. रक्ताचा तुटवडा असल्याची बातमी समोर आल्यानंतर रक्तदान शिबिराचे आयोजन करावे हा विचार आला आणि आज त्याला प्रत्यक्ष रूप प्राप्त झाले आहे. शिवाय मागील वर्षी शाहू फाउंडेशनच्या जवळपास ३ हजार सहकाऱ्यांनी रक्तदान केले होते. यावर्षी देखील ३१०० रक्तदात्यांनी रक्तदानाच्या महायज्ञात सहभाग घेतला होता. अशाप्रकारे ही रक्तदानाची चळवळ शाहू फाउंडेशन, वन बुलढाणा मिशन यांद्वारे राबविल्या जात आहे. असे संदीप शेळके म्हणाले.