राजर्षी शाहू ग्रामीण पतसंस्थेला आयएसओ मानांकन! ​​​​​​​

 
fkdfjld

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सर्वोत्तम बँकिंग सेवेबद्दल राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेला ९००१: २०१५ आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. एव्हीपी बिझनेस सोल्युशन इंडिया प्रा. लि. कंपनीचे संचालक पुरुषोत्तम गिरी यांच्या हस्ते संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब शेळके यांना २३ सप्टेंबर रोजी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेची १४ फेब्रुवारी २००२ रोजी शिरपूर येथे स्थापना झाली. आज संस्थेच्या ३० शाखा आहेत. ग्राहक, सभासद, ठेवीदारांचे हित जोपासत अनेक कल्याणकारी योजना राबवण्यास संस्थेने प्राधान्य दिले आहे. त्यामुळे तळागाळातील माणूस संस्थेसोबत जोडला गेला आहे. शेतकरी, कष्टकरी, व्यावसायिक, महिला बचतगट, वंचित घटकांना पाठबळ देण्याचे काम संस्थेने केले आहे. 

संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत आहेत. बँकिंग सेवेत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. प्रशिक्षित कर्मचारी, प्रशस्त इमारत, परिसर स्वच्छता यासह ग्राहकांना दर्जेदार सुविधा संस्थेकडून पुरवल्या जातात. तसेच वृक्ष लागवड, रक्तदान शिबिर, शेतकऱ्यांना बांधावर खत, आरोग्य शिबिर, महिला बचतगट मेळावे, मार्गदर्शन शिबिर, स्वर्गरथ, वनराई बंधारे यासह इतर सामाजिक उपक्रम  राबवण्यात येतात. दर्जेदार बँकिंग सेवा पुरवण्यासह सामाजिक उपक्रमांची दखल घेत संस्थेला आयएसओ मानांकन जाहीर झाले आहे.