अनिल म्हस्के यांचा राज ठाकरेंच्या हस्ते विशेष गौरव! पिंप्री चिंचवड येथे पार पडला सन्मान सोहळा

 
Am
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): राज्यभरातील पत्रकारांच्या कल्याणासाठी, संरक्षण आणि हक्कासाठी लढणारे पत्रकार अनिल म्हस्के यांचा पिंप्री चिंचवड एडिटर गिल्डच्या वतीने व मनसे प्रक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते पिंप्री चिंचवड येथे विशेष गौरव करण्यात आला. ग. दि. माडगुळकर सभागृहात १९ ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार हल्ला विरोधी परिषदेच्या दुसऱ्या हा सन्मान सोहळा पार पडला.

पिंप्री चिंचवड (पुणे) येथे नामांकित आणि आघाडीच्या वृत्रपत्रांचे व वृत्तवाहिन्यांचे संपादक यांनी एकत्र येत एडिटर गिल्डच्या वतीने पत्रकार हल्ला विरोधी परिषदेचे आयोजन केले होते. पत्रकारांच्या कल्याणासाठी, त्यांच्या रक्षणासाठी झटणारे आणि पत्रकारीतेच अमुल्य योगदान देणाऱ्या राज्यातील १३ झुंझार संपादकांचा विशेष गौरव यावेळी करण्यात आला. यामध्ये संपूर्ण विदर्भ - मराठवाड्यातून एकमेक अनिल म्हस्के यांचा समावेश होता. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते अनिल म्हस्के यांना पुरस्कार प्रदान करुन त्यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश चिलेकर होते. यावेळी संपादक मंदार फणसे, संपादक संजय आवटे, संपादक सम्राट फडणीस, संपाद कमलेश सुतार, संपादक अविनाश थोरात, कार्यकारी संपादक शितल पवार यांच्यासह इतर संपादकांची प्रमुख उपस्थिती होती.

 जिल्हा बॅकेतील तत्कालीन संचालक मंडळीच्या विरोधात धडाकेबाज वृत्तामालिका चालवून अनिल म्हस्के यांनी बॅकेतील अपहार चव्हाट्यावर आणला होता. जिल्हा पत्रकार भवनाची निर्मिती त्यांच्या जिल्हाध्यपदाच्या कार्यकाळात झाली. पत्रकारांना पहिल्यांदाच विमा सुरक्षा कवच देण्याचा उपक्रम अनिल म्हस्केंनी राबविला.
 त्यानंतर राज्यभरातील पाच हजार पत्रकारांचा विमा उतरविण्यात आला. पत्रकारांची संपूर्ण आरोग्य तपासणी करण्याचा उपक्रम त्यांनी राबविला. राज्यातील उपेक्षित पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणार्थ अनिल म्हस्के झोकून देऊन काम करत आहेत. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ असावे, ही मागणी त्यांनी शासन दरबारी रेटून धरली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. अधिवेशनातही हा मुद्दा आमदारांमार्फत उपस्थित करण्यात आला, या सर्व कार्याचा उल्लेख या समारंभात करुन अनिल म्हस्के यांचा विशेष गौरव करण्यात आला.