पावसासह वादळी वाऱ्याने उडाली जिल्हा परिषद शाळेचे टीनपत्रे! झाडेही कोसळली, चिखली तालुक्यात अवकाळीचा कहर..

 
Etj
चिखली(ऋषी भोपळे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने चिखली तालुक्यातील अनेक गावात अक्षरशः कहर केला. झाडे कोसळली, वाहतूक विस्कळीत झाली, गुराढोरांच्या गोठ्यांची पडझड झाली इतकेच नाही तर, सोमठाणा गावातील जिल्हा परिषद शाळेचे टिनपत्रे देखील उडाले. सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नसली तरी, अनेकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. 
  भरोसा, सोमठाणा तसेच परिसरातील विविध गावात काल सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. पावसासह सुसाट वेगाचा वादळी वारा सुटला होता. भली मोठी झाडे जमीन दोस्त झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. नजीकच्या गावांमधील अनेकांच्या घरावरील छप्पर उडाल्याचे समजते. सोमठाणा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील टीनपत्रे उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची मदत शासनाने त्वरित करावी अशी मागणी शेतकरी नेते विनायक सरनाईक यांनी केली आहे.