BREAKING जिल्ह्यात पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगाच रांगा! ट्रकचालकांच्या संपामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता...

 
बँकॉक
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): नव्या वाहतूक कायद्याविरोधात ट्रकचालकांनी दंड थोपटले आहेत. अपघात झाल्यावर अपघातास कारणीभूत वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाल्यास १० लाखांचा दंड आणि १० वर्षे कारावास या नव्या कायद्याला ट्रक चालक ,टँकर चालक यांच्याकडून विरोध होत आहे..या कायद्याचा निषेध म्हणून अखिल भारतीय स्थरावर ट्रकचालक आजपासून संपावर गेले आहेत..यामुळे जनजीवन विस्कळित होण्याची श्यकता आहे...पेट्रोल पंपावर इंधन पुरवठा करण्यासाठी येणारे टँकर चालक सुद्धा या संपात सहभागी झाल्याने इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे..दरम्यान आज सायंकाळ पासून बुलडाण्याच्या पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत..
Truck
बुलडाणा शहरासह जिल्हाभरातील पेट्रोल पंपावर वाहनचालक पेट्रोल,डिझेल भरण्यासाठी गर्दी करीत आहेत. काही पेट्रोल पंपावर इंधन मिळवण्याच्या वादातून किरकोळ वाद झाल्याने पोलिसही तैनात करण्यात आल्याचे वृत्त आहे. 
तीन दिवस संप...
नव्या मोटार वाहन कायद्याला विरोध म्हणून बीपीसीएल , एचपीसीएल आणि इंडियन ऑईल या तिन्ही कंपन्यांचे पेट्रोल डिझेल पुरवणाऱ्या टँकर चालकांनी तीन दिवसीय संप पुकारला आहे. ३ जानेवारी पर्यंत टँकर चालक संपावर गेले आहेत. त्यामुळे पेट्रोल पंपांना आज इंधन पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे.
पेट्रोल पंप चालक म्हणतात...
ट्रकचालकांच्या संपामुळे तुटवडा निर्माण होण्याची श्यकता आहे. मात्र वाहनचालकांनी आपल्या गरजेपेक्षा जास्त इंधन वाहनात भरून ठेवू नये. रुग्णवाहिका, शाळेच्या बस यांना वेळ प्रसंगी तातडीने इंधन पुरवठा करता आला पाहिजे..
     - सचिन बोंद्रे, पेट्रोल पंप चालक, मेरा खुर्द