खेळ पैठणीचा कार्यक्रमाची जय्यत तयारी! संदीप शेळकेंनी घेतला तयारीचा आढावा; सिनेअभिनेते क्रांतीनाना मळेगावकर बुलडाण्यात पोहचले!
थोड्याच वेळात होणार कार्यक्रमाला सुरुवात; बुलडाणा लाइव्ह वर होणार थेट प्रक्षेपण...
Jan 29, 2024, 17:16 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): "न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा" ह्या बहुप्रतिक्षित कार्यक्रमाला थोड्याच वेळात, सायंकाळी ६ वाजता सुरुवात होणार आहे. बुलडाण्यातील शारदा ज्ञानपीठच्या भव्य प्रांगणात हा कार्यक्रम होत आहे. राजश्री शाहू मल्टीस्टेट तसेच धनिक ॲडव्हायझर्स यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नुकतेच कार्यक्रमास्थळी राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष तथा वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी तयारीचा आढावा घेतला. कार्यक्रमानिमित्त मराठी सिने अभिनेता क्रांतीनाना मळेगावकर बुलडाण्यात पोहोचले आहेत. "न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा" या कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून थोड्याच वेळात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे.
कार्यक्रमास्थळी भव्य स्टेज उभारण्यात आले आहे. जागोजागी लख्ख प्रकाश सोडणारे खांब उभे करण्यात आले आहे. तसेच एलईडी स्क्रीन सुद्धा बसवण्यात आल्या आहेत. महिलांसाठी आसन व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी आवश्यक त्या सर्व बाबी उपलब्ध केल्या जात आहेत. आयोजन पाहता हजारोंच्या संख्येने महिलावर्ग उपस्थित राहणार असल्याचे कळते, मागील वर्षी सुद्धा याच कार्यक्रमाला बुलडाणेकर महिलांनी उदंड प्रतिसाद दिला होता. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण बुलडाणा लाइव्ह च्या युट्युब प्लॅटफॉर्मवर पहायला मिळणार आहे.