प्रहारचे बच्चू कडू आज मातृतीर्थ सिंदखेडराजात! मनोज जरांगेच्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ करणार हटके आंदोलन! रक्त सांडून नव्हे तर...

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): गोरगरीबांच्या आणि खास करुन अपंगांच्या कल्याणार्थ आ. बच्चू कडू यांचे आंदोलने राज्यभर चर्चेत राहतात. मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ प्रहार देखील आज मातृतिर्थ सिंदखेड राजा नगरीत आंदोलन करणार आहे. प्रहार स्टाईल हे हटके आंदोलन राहील. कडूंच्या नेतृत्वात 'एक थेंब रक्ताचा, प्रामाणिक योध्यासाठी ' या टॅगलाईन नुसार रक्तदानाचा महायज्ञ पार पडणार आहे.
मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथे मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडले आहे. महत्वाचे म्हणजे या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जने मराठा बांधव आधीच संतप्त झालेले आहेत.शासनाने दिलेल्या वेळत देखील ठोस काही हाती न लागल्याने जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणास्त्र हाती घेतले. काल-परवा त्यांची तब्बेत बिघडत असल्याचे आंदोलनाला हिंसक वळण लागले. दरम्यान आ. बच्चू कडू प्रहार स्टाईल मनोज जरांगेच्या समर्थनार्थ हटके आंदोलन करणार आहेत. रक्त सांडून नव्हे तर शेकडो कार्यकर्त्यांसह रक्तदान करुन जरांगेंना समर्थन देण्यासाठी मातृतिर्थ सिंदखेड राजा नगरीत आज १ नोव्हेंबर २०२३ रोजी मॉसाहेब जिजाऊंच्या जन्मस्थळासमोर असलेल्या संत सावता भवनात रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
या आंदोलनात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येणे उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाप्रमुख वैभवराजे मोहिते यांनी केले आहे.