BREAKING बुलडाणा शहरातील कॅफेंवर पोलिसांची छापेमारी! छुप्या खोलीत दोन मुली आढळल्या..
Updated: Feb 21, 2024, 16:16 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बुलडाणा शहरातील तीन कॅफेंवर आज २१ फेब्रुवारीच्या अचानक दुपारी पोलिसांनी धाड टाकली. दरम्यान येथील धाड नाका परिसरातील कॅफेत छुप्या खोलीत दोन मुली आढळून आल्याचे धक्कादायक चित्र होते. पोलिसांनी त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली असून कॅफे मालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
मिळालेल्या गोपनीय माहिती आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका गोरे यांनी पथकासह शहरातील तीन कॅफेंणवर दुपारी अचानकपणे धाड टाकली. शहरातील धाड नाका परिसरातील कफेंवर ही कारवाई करण्यात आली. यासह शहरातील छोट्या मोठ्या कॅफेंवर पोलीस आता बारीक नजर ठेवून आहेत.