देऊळगावमहीचा विशाल देऊळगावराजा पोलिसांनी पकडला! हातात देशी कट्टा घेऊन मध्यरात्री १२ ला "तिथे" उभा होता; काय होता विशालला प्लॅन?

 
police

देऊळगावराजा(राजेश कोल्हे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यातील देऊळगाव मही येथील एका युवकास विनापरवाना देशी कट्टा व जिवंत काडतुसासह  ३० सप्टेंबरच्या रात्री उशिरा  पोलिसांनी ताब्यात घेतले. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

 देऊळगाव मही  गावाबाहेरील रोड लगत असलेल्या  पेट्रोलपंपानजीक एक युवक देशी कट्टा व काडतुस बाळगून उभा आहे. अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार घटनास्थळी पोलीस पथक रवाना करून संशयित युवकाचा शोध घेण्यात आला. ३० सप्टेंबरच्या रात्री १२ वाजे दरम्यान मोठ्या शिताफीने देऊळगाव राजा पोलिसांनी अरोपी युवकाला ताब्यात घेतले. दरम्यान विचारपूस केली असता सदर युवकाचे नाव विशाल नारायण दिघे (वय २३ वर्ष) असल्याचे कळाले. सदर युवकाकडे स्टील बॉडी असलेला व लाकडी पिस्टल ग्रीप असलेला कट्टा तसेच ४.२ रुंदी व एक इंच पितळी (इंग्रजीत KF ७.६५) असे कोरलेले असा एकूण पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. याबाबत पोलीसांनी परवाना विषयी विचारले असता  असता सदरचे हत्यार विनापरवाना बाळगल्याचे स्पष्ट झाले. दस्तरखुद्द आरोपी युवकांने परवाना नसल्याचे पोलिसांना सांगितले त्यानंतर देऊळगाव राजा पोलिसांनी युवकावर ३.२५आर्म ॲक्टसह कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला. 
दरम्यान विशाल कडे देशी कट्टा कुठून आला? मध्यरात्री १२ ला तो पेट्रोल पंपाजवळ कशाला उभा होता? कुणाचा घातपात करण्याचा तर त्याचा प्लॅन नव्हता ना ? या सर्व बाबींचा तपास आता देऊळगाव राजा पोलिसांना करावा लागणार आहे.

 सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी महामुनी, उपविभागीय पोलीस अधिकारी देऊळगाव राजा अजय कुमार मालविय यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संतोष महल्ले, सपोनी हेमंत शिंदे, पोहेकॉ कलीम देशमुख, विश्वनाथ काकड, सय्यद मुसा, पोना गणेश जायभाये, पोकॉ निलेश मोरे यांनी केली आहे.