पेरणी महोत्सवाला रुईखेड, खुपगावातून प्रारंभ! जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट बांधावर मिळणार खत; संदीप शेळकेंच्या "वन बुलडाणा मिशन"चा पुढाकार !

 
hgh

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): 'वन बुलडाणा मिशन' अंतर्गत ७ मे रोजी सकाळी रुईखेड टेकाळे व खुपगाव येथे भव्य पेरणी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांना थेट बांधावर खत पुरवठा करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. उपक्रमाचे यंदाचे चौथे वर्षे आहे. 

राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संदीप शेळके यांनी  'वन बुलडाणा मिशन' ची स्थापना केली आहे.  ही एक लोकचळवळ आहे. याअंतर्गत जिल्ह्याच्या विकासासाठी भरीव काम करण्यात येणार आहे. शेतकरी, कष्टकरी, युवक, विद्यार्थी, सैनिक, उद्योजक, महिला बचतगट अशा सर्वच घटकांसाठी ही लोकचळवळ काम करणार आहे. 

 दरम्यान रविवारी सकाळी वन बुलडाणा मिशन अंतर्गत रुईखेड टेकाळे, खुपगाव येथे पेरणी महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. शेतकऱ्यांना मूळ किंमतीत थेट बांधावर खतांचा पुरवठा करण्यास सुरुवात करण्यात आली. यावेळी साळूभाऊ उबरहंडे, बबनराव टेकाळे, शेषराव टेकाळे, साहेबराव टेकाळे, वासुदेव टेकाळे, तोताराम टेकाळे, राजू टेकाळे, नंदाजी टेकाळे, गजानन टेकाळे, बाळासाहेब देशमुख, प्रल्हाद टेकाळे, गोविंद देशमुख, मदन टेकाळे, गजानन उबरहंडे, गोकुळ टेकाळे, मधुकर टेकाळे, अंबादास टेकाळे, शरद उबरहंडे, विजय टेकाळे, बंडू टेकाळे, गणेश टेकाळे, अनिल टेकाळे, भागवत टेकाळे आदींची उपस्थिती होती.