वीर जवान अक्षयला शेवटचा निरोप द्यायला पिंपळगाव सराईत उसळला जनसागर! अमर रहे च्या घोषणांनी आसमंत दुमदुमला!

आई - बहिणीचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश....सारेच गहिवरले; पिंपळगाव सराईत अक्षय यांचे स्मारक उभारणार असल्याचा आ. श्वेताताईंचा शब्द.
 
Bxbxh
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारत माता की जय, अमर रहे अमर रहे वीर जवान अक्षय गवते अमर रहे च्या गगनभेदी पण काळजाला भिडणाऱ्या घोषणा अन् वीर जवान अक्षयच्या आठवणींनी शोकाकुल झालेला विराट जनसमुदाय...अशा शोकाकुल पण देशभक्तीने भारलेल्या वातावरणात आज,२३ ऑक्टोबरला दुपारी १ च्या सुमारास पिंपळगाव सराईत वीर जवान अक्षय गवते यांना शेवटचा निरोप देण्यात आला. मुलाच्या खांद्यावर शेवटचा निरोप मिळावा अशी अपेक्षा असताना अक्षयच्या वडिलांवर मात्र अक्षयला अग्नी देण्याची वेळ आली..
Hxb
वीर जवान अक्षय गवते यांना २० ऑक्टोबरच्या रात्री ११:३५ वाजता सियाचीन ग्लेशीअर येथे कर्तव्यावर असताना वीर मरण आले होते. काल,२२ ऑक्टोबरला त्यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आले. आज,२३ ऑक्टोबरला सकाळी १० च्या सुमारास अक्षयचे पार्थिव मुळ गावी पिंपळगाव सराई येथे आणण्यात आले. अक्षयच्या घरी पार्थिव नेण्यात आल्यानंतर तिथून अक्षय यांच्या शेतापर्यंत अंतयात्रा काढण्यात आली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती, ठीकठिकाणी अक्षय यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात येत होती. भारत माता की जय, वंदे मातरम्, अमर जवान अक्षय गवते अमर रहे या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. अक्षय यांच्या शेतात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याआधी सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांनी अक्षयच्या कुटुंबीयांकडे तिरंगा ध्वज सुपूर्द करण्यात आला.
अक्षयचे स्मारक उभारणार: आमदार श्वेताताई महालेंचा शब्द..
वीर जवान अक्षयचे जीवन प्रेरणादायी आहे. देशासाठी त्याने केलेले बलिदान सदैव स्मरणात राहील. अक्षयच्या बलिदानाने येणाऱ्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून पिंपळगाव सराई येथे अक्षय यांचे प्रेरणादायी स्मारक उभारणार असल्याचे आ. श्वेताताई या प्रसंगी म्हणाल्या..!