सागवनच्या तलाठ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ बुलडाण्यात पटवारी संघाचे एकदिवसीय धरणे आंदोलन!

 
Hxbxb
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सागवनचे तलाठी नितीन अहिर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ विदर्भ पटवारी संघ नागपूर यांच्यावतीने आज १९ ऑक्टोबर रोजी बुलडाणा येथील तहसील कार्यालय समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. 
बुलडाणा तहसीलदार रुपेश खंडारे यांना दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, कोलवड तलाठी नितीन अहिर यांच्यावर १० ऑक्टोबर रोजी विशाल अशोक सोनुने रा. सागवान यांनी केलेल्या भ्याड हल्ला करून त्यांना शिवीगाळ व लोटपाट केली. विशाल अशोक सोनुने यांचेवर कलम ३५३, ३३२, २९४, ५०६, ५०३ नुसार पोलीस स्टेशन बुलडाणा येथे एफ.आर.आय. दाखल करण्यात आलेला आहे. त्यानुसार यांना तत्काळ अटक करून कठोर कार्यवाही करावी. नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटपा साठी क्षेत्रीय स्तरावर गांवे वाटून देण्यात आलेली आहे, त्यानुसार तलाठी यांच्याकडील गांवांची माहिती देण्यात आलेली आहे. त्यानुसार संबधित गावाचे नैसर्गिक आपत्ती अनुदान वाटप बाबत संबधित गावाचे तलाठी यांना हे खातेदार संबधित माहिती सादर करतील. 
  संबंधित सर्व तलाठी यांनी अनुदान वाटपाच्या अद्यावत याद्या तहसिल मध्ये जमा करण्यात आले आहे. व तहसिल कार्यालय मार्फत सदर याद्या अपलोड केलेल्या आहे. त्यानंतर त्यासंबधी येणाऱ्या तांत्रिक अडचणी बाबत तहसील स्तरावर सोडवाव्यात याव्या, तलाठी यांना त्यासंबंधी तांत्रिक ज्ञान नसल्यामुळे पूर्ण तालुक्यातील एकत्रित खातेदाराच्या वेगवेगळ्या ७ फाईल मधील खातेदारामधून प्रलंबित असलेले खतेदार शोधून काढून माहिती सादर करणे शक्य नाही. आणि सदर काम करतांना त्यांचेकडून चुका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे चुकीचा डाटा अपलोड झाल्यास त्यास पूर्णपणे तलाठी संवर्गास जबाबदार धरण्यात येते. सदर कामासाठी आपल्या स्तरावरून त्यासंबधित ज्ञान असणाऱ्याकडून काम करावे जेणेकरून संभाव्य होणाऱ्या चुका किंवा अचूक काम करणे शक्य होईल. ३ ऑक्टोबर रोजी तालुक्यातील महिला तलाठी यांची एक दिवसाचे बिनपगारी वेतन कपात करण्यात आले आहे. संबंधित महिला तलाठी हे तहसिल कार्यालयात सायंकाळी ७ वाजेपर्यंत हजर असून व अनुदान वाटपाची माहिती संबधित मंडळ अधिकारी यांचेकडे सादर केल्यानंतर सुद्धा जाणीवपूर्वक एक दिवसाची बिनपगारी करण्यात आली आहे व ती संबंधित तलाठी यांचेवर अन्यायकारक असल्याने रद्द करण्यात यावी. अशा मागण्याचे निवेदन देण्यात आले.
   या आंदोलनात अतुल झगरे, गोपाल राजपूत, रंजना पाटील, संगीता इंगळे, टेकाळे, चिंचोले, अरुणा सोनुने, रेखा वाणी, हिरालाल गवळी, प्रभाकर गवळी, अमोल सुरडकर, इतवारे, उषा देशमुख, अनुराधा लवंगे, रेश्मा चव्हाण, हुडेकर, जगताप, कांचन खरात सहभागी झाले होते.