पालकांनो तुमच्या मुलांना डॉक्टर इंजिनिअर बनवायचेय ना..मग ही बातमी खास तुमच्यासाठी! वर्ग ६ वी पासूनच करा NEET आणि JEE ची तयारी!

बुलडाण्यात करिअर पॉइंट कोटाची ३० जुलैला होणार प्रवेश परिक्षा; "या" ६ विषयांची तयारी आत्तापासूनच..                                                      

 
cp

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): NEET आणि JEE या राष्ट्रीय पातळीवरील वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या परीक्षेची तयारी करण्याचे उत्कृष्ट दालन म्हणून बुलडाणा येथील करिअर पॉइंट कोटा ने नावलौकिक मिळविला आहे. अर्थात आतापर्यंतच्या दोन्ही बॅचचा दणदणीत रिझल्ट, सामान्य कुटुंबातून आलेल्या विद्यार्थ्यांनी करिअर पॉइंट च्या मार्गदर्शनामुळे मिळवलेले गुण या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. यंदाचा CET , JEE आणि NEET या परीक्षांचा रिझल्ट देखील दणदणीत आला आहे. तब्बल १२ पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ५०० पेक्षा अधिक गुण मिळवले असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस ला प्रवेश मिळणार आहे. योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासात नियमितता असेल तर बुलडाणा जिल्ह्यासारख्या ग्रामीण भागातून आणि त्यातही सामान्य कुटुंबातून सुद्घा डॉक्टर, इंजिनिअर घडवता येऊ शकतात हे करिअर पॉइंट कोटाच्या बुलडाणा शाखेने दाखवून दिले आहे. NEET आणि JEE चा कठीण प्रवास आणखी सोपा व्हावा म्हणून करिअर पॉईंटच्या वतीने गेल्या ३ वर्षांपासून "फाऊंडेशन बॅचेस" सुरू केल्या आहेत. वर्ग ६ वी ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची NEET आणि JEE साठीची तयारी त्यामाध्यमातून करून घेण्यात येते.दरवर्षी प्रवेश परीक्षा घेऊन त्यासाठी विद्यार्थी निवडण्यात येतात. यंदाची प्रवेश परीक्षा ही रविवारी ३० जुलै रोजी होणार आहे.                                             

NEET आणि JEE या कठीण वाटणाऱ्या परीक्षेची तयारी लवकर सुरू केली तरच यशाची खात्री अधिक असते. १० वी नंतर तयारी करण्यापेक्षा टप्प्याटप्प्याने परीक्षेची तयारी करणे कधीही चांगले. त्यामुळे कमी तयारीच्या आणि अपुऱ्या मार्गदर्शनाच्या अभावामुळे परीक्षा रिपीट केल्यापेक्षा तशी वेळच आपल्या पाल्यांवर येऊ नये याची काळजी पालकांना घ्यावी लागणार आहे. त्यासाठीच करिअर पॉइंट कोटा च्या बुलडाणा शाखेने फाऊंडेशन बॅचेस सुरू केले आहेत. वर्ग ६ वी ते १० पर्यंतच्या प्रत्येक वर्गाच्या वेगवेगळ्या बॅचेस राहणार आहेत. कोटा, दिल्ली यासह देशभरातील नामवंत शैक्षणिक संस्थांमध्ये शिकविण्याच्या अनुभव असलेले तज्ञ प्राध्यापक फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथेमॅटिक्स, मेंटल एबिलिटी आणि इंग्लिश अशा ६ विषयांची तयारी करून घेणार आहेत. ३० जुलैरोजी प्रवेश परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनाच फाऊंडेशन बॅच मध्ये प्रवेश मिळणार आहे, त्यामुळे प्रवेश परीक्षेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन करिअर पॉइंट कोटा च्या बुलडाणा शाखेने केले आहे. प्रवेश परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची त्यांच्या मागील वर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारीत परीक्षा होईल. नोंदणी करण्यासाठी व अधिक माहितीसाठी संपर्क: 7020782965