दुःखद! खासदार प्रतापराव जाधवांना बंधुशोक; मेहकरचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांचे निधन; आज संध्याकाळी होणार अंत्यसंस्कार

 
hehr

मेहकर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मेहकरचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव यांचे निधन झाले आहे. खा. प्रतापराव जाधव यांचे ते लहान बंधू होते. छत्रपती संभाजीनगरातील हॉस्पिटल मध्ये गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.

 आज,२५ ऑगस्टच्या दुपारी अडीच वाजेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २००६ मध्ये संजय जाधव मेहकर नगरपरिषदेचे अध्यक्ष झाले होते. अडीच वर्ष त्यांनी कार्यकाळ सांभाळला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून ते लिव्हर च्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर छत्रपती संभाजी नगरातील एका हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. मात्र आज त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. संजय जाधव यांच्यावर आज संध्याकाळी ७ वाजता जानेफळ रोडवरील स्मशान भूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.