वरवंड येथे उद्या पाडवा पहाट! इंडियन आयडॉल फेम राहुल खरे यांची रंगणार मैफल; राजर्षी शाहू परिवाराचे आयोजन

 
Bxhxj
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): तालुक्यातील वरवंड येथे मंगळवारी १४ नोव्हेंबर रोजी पहाटे 'पाडवा पहाट' ही शब्द सुरांची सुश्राव्य मैफल रंगणार आहे. सुप्रसिद्ध गायक व इंडियन आयडॉल फेम राहुल खरे विविधांगी गीतांचा खजाना सादर करणार आहे. याला जोडूनच स्नेहमीलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
  Bdbdb
Hxnx
सुसज्ज नियोजन व आयोजन बद्दल ख्यातिप्राप्त राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके व मालतीताई शेळके या रसिक दाम्पत्याने संगीत प्रेमींसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. वरवंड येथील स्वर्गीय वसंतराव नाईक गोदाम परिसरात व गुलाबी थंडीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी राहुल खरे हे एकाहून एक सरस गीते सादर करणार आहे. भावगीत, भजन, भारुड, लावणी, अभंग अश्या सर्व प्रकारच्या रचनांचा यामध्ये समावेश आहे. सूर ताल, काव्य अन संगीत याचा सुश्राव्य संगम असलेल्या या संगीत सोहळ्याचा लाभ घेण्याचे विनम्र आवाहन संदीप शेळके व मालतीताई शेळके यांनी केले आहे.
Hbdbd
Bxncn
Jxnnx