पदमश्री डॉ. हिम्मतराव बावस्कर यांची ना. प्रतापराव जाधव यांना 'ही' मागणी, म्हणाले..

 
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) विविध आजारावर उपाययोजनेसाठी बुलढाणा येथे आयसीएमआर म्हणजे इंडियन कौन्सिल एमएफ मेडिकल रिसर्च प्रादेशीक केंद्राला मंजुरी द्यावी, अशी मागणी विंचू आणि साप विषयावर संशोधन करणारे डॉ.हिम्मतराव बावस्कार यांनी केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्याकडे केली आहे.
डॉ. बावस्कर हे महाड येथे काम करत आहेत. ग्रामीण वैद्यकीय समस्या जसे की विष (विंचू आणि साप) मध्ये ग्राउंड ब्रेकिंग क्लिनिकल संशोधन केले असून अलीकडेच अकोला, अमरावती व बुलढाणा ग्रामीण भागातील खारपाण पट्टामध्ये दीर्घकालीन मूत्रपिंड निकामी कसे टाळता येईल यावर उपाय दिला आहे. त्यांचे अकरावीपर्यंतचे शिक्षण बुलढाणा येथून झाले असून बुलढाणा आणि तेथील ग्रामीण लोकसंख्येच्या दृष्टीने आयसीएमआर केंद्र आवश्यक आहे.
जिल्ह्यात सिकलसेल रोग, कुपोषण, मधुमेह, उच्च रक्तदाब आणि आयएचडीसारखे संसर्गजन्य आणि चयापचय रोग आणि या भागातील साखळी, धामणगाव बडे आदी भागातील सर्वात महत्त्वाचा अनुवांशिक विकार स्पिनोसेरेबेलर ॲटॅक्सिया यासह विविध रोगांचा अभ्यास करून त्यावर उपाय देण्यास अयसीएमआर केंद्र मदत करेल. बुलढाणा या जिल्ह्याच्या ठिकाणी आयसीएमआर (इंडियन कौन्सिल एमएफ मेडिकल रिसर्च) प्रादेशिक केंद्राला मंजुरी दिल्यास बुलढाणा जिल्ह्यासह परिसरातील जिल्ह्याला मोठा फायद होईल, त्यामुळे बुलढाणा येथे आयसीएमआर प्रादेशीक केंद्राला मंजुरी द्यावी, अशी मागणी डॉ.बावस्कार यांनी केली आहे.