संतापजनक! ६० वर्षीय वासनांध म्हाताऱ्याच्या अंगी विकृत चाळे; ११ वर्षाच्या चिमुकलीवर वाईट नजर पडली, भर दुपारी तिच्याशी...! नांद्रा कोळीची घटना

 
Fhcc
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): वासनांध विकृत मनोवृत्तीची माणसे कधी काय करतील याचा नेम राहिला नाही. बुलडाणा तालुक्यातील नांद्रा कोळी येथे एका विकृत वासनांध म्हाताऱ्याने भलतेच चाळे केले. ते करतांना त्याला जनाची सोडा आणि मनाचीही लाज वाटली नाही. ११ वर्षीय चिमुकलीवर त्याची वाईट नजर पडली आणि तिच्यासोबत त्याने जबरदस्ती अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. चिमुकलीच्या आईने बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाणे गाठून याप्रकरणाची तक्रार दिली असून पोलिसांनी म्हाताऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
अब्दुल शहा तुकडोशहा (६०,रा. नांद्रा कोळी, ता.बुलडाणा) असे वासनांध म्हाताऱ्याचे नाव आहे.
पीडित मुलगी ११ वर्षाची आहे. घटनेच्या दिवशी दुपारी ३ वाजता मुलगी साखर,चहापत्ती आणि दुध आणण्यासाठी दुकानात जात होती. दुपारच्या वेळी गल्लीत कुणी नसल्याचे पाहत अब्दुल शहा या म्हाताऱ्याने पीडित मुलीला दहा रुपये दिले.
    नराधमाने वाईट उद्देशाने मुलीला कवेत ओढून घेतले. तिच्या शरीराच्या अवयवांना वाईट उद्देशाने स्पर्श करीत जबरदस्ती अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न केला. म्हाताऱ्याच्या चाळ्यांनी घाबरलेल्या पीडित मुलीने कशीबशी सुटका करून घरी घडलेला प्रकार सांगितला. मुलीच्या आईने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.