आमचा धनुष्यबाण चोरला हो...! बुलडाण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची पोलीस ठाण्यात तक्रार...

 
Cvbn
बुलडाणा(राहुल रिंढे: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नाव एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाण्याची भूमिका घेतली आहे. दरम्यान आज, २० फेब्रुवारीला उद्धव ठाकरेंच्या गटाकडून बुलडाण्यात निवडणूक आयोगाचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्यात आला. आमचा धनुष्यबाण मिंधे गटाने चोरलाय अशी तक्रारच बुलडाणा शहर पोलीस  ठाण्यात देण्यात आली आहे.

Senaठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निवडणूक आयोगाचा निषेध केला. हा निर्णय विकत घेण्यात आलाय, २००० कोटींची डील हा निर्णय घेतांना झाली या संजय राऊतांनी केलेल्या विधानाचे उद्धव ठाकरे गटाकडून समर्थन करण्यात आले. निवडून आयगोचा निषेध असो, पन्नास खोके एकदम ओके अशा घोषणा यावेळी उद्धव ठाकरे गटांच्या शिवसैनिकांकडून देण्यात आले. लखन गाडेकर, अनिल रिंढे, गणेश सोनुने, अमोल बुधवंत , दीपक इंगळे, हेमंत खेडेकर आदींनी ही तक्रार दाखल केली आहे.