...अन्यथा चिखलीचे व्यापारी आंदोलन उभारणार!

 
file photo
चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ८ दिवस उलटूनही व्यापारी कमलेश पोपट यांचे मारेकरी सापडत नसल्याने चिखलीच्या व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्‍त करत पोलिसांना निवेदन दिले. यावेळी आंदोलनाचा इशाराही दिला.
मारेकरी सापडत नसल्याने व्यापारी बांधवांचा संयम सुटत चालला आहे. पोलिसांनी लवकरात लवकर मारेकऱ्यांचा शोध लावावा अन्यथा व्यापारी बांधवांना आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल, असे निवेदन किराणा व्यापारी असोसिएशनने काल दिले. व्यापाऱ्यांनी व्यापार कसा करावा व स्वतःचे संरक्षण कसे करावे, अशी भीती निर्माण झाल्याचे निवेदनात म्‍हटले आहे. निवेदन देताना असोसिएशचे अध्यक्ष गोपाल शेटे, सचिव कैलास भालेकर, कोषाध्यक्ष पियुष अग्रवाल, नरेश वाधवाणी, महेश व्यवहारे, विजू पाटील, अमेय राठी, सन्नी भोजवाणी, सागर पुरोहित आदी उपस्‍थित होते.