अवघा महाराष्ट्र शोकसागरात! शोकाकुल वातावरणात बुलडाण्यात २४ जणांवर अंत्यसंस्कार! आप्तेष्टांच्या आक्रोश, किंकाळ्यानी सारेच गहिवरले! बातमीतील फोटो पाहून दगडालाही पाझर फुटेल...

 
fire
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): समृद्धी महामार्गावर अपघातात बळी गेलेल्या २५ पैकी २४ जणांवर आज बुलडाण्यातील संगम तलाव स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईकांचा आक्रोश, काळीज पिळवटून टाकणाऱ्या किंकाळ्या आसमंत चिरून टाकत होत्या. मंत्री गिरीश महाजन , जिल्हा प्रशासनातील अधिकारी यांच्यासह उपस्थित साऱ्यांनीच आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून दिली. दुपारी सव्वाबाराला हा अंत्यविधी पार पडला.
 

mjdjkjd

समृध्दी महामार्गावर काल मध्यरात्री झालेल्या अपघातात २५ जणांचा कोळसा झाला होता. सर्व मृतदेह कालपासून बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले होते. मृतकांची नावे समोर आली तरी कोणता मृतदेह कुणाचा हे  स्पष्ट होत नव्हते. २५ पैकी एका मृतदेह मुस्लिम तरुणीच्या मृतदेहाची ओळख तिच्या कुटुंबीयांनी पटवली. त्यामुळे तो मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. बुलडाणा शहरातील मुस्लिम कब्रस्तानात त्या तरुणीवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. उर्वरित २४ जणांचे मृतदेहावर बुलडाणा शहरातील  संगम चौक स्मशानभूमीत सामूहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.

img

   २४ सरणांवर २४ मृतदेह ठेवण्यात आले. तत्पूर्वी जिल्हा रुग्णालयातून सजवलेल्या रथांमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. कोणत्या मृतदेहाजवळ जावे अन कुणाच्या गळ्यात पडून हंबरडा फोडावा अशी नातेवाईकांची अवस्था झाली होती.

hj

 संगम तलाव स्मशानभूमीत हिंदू धर्म पद्धतीने सगळ्यांवर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईकांना आज सायंकाळी प्रशासनाच्या वतीने अस्थिकलश देण्यात येणार आहे. कोणता मृतदेह कुणाचा हे स्पष्ट नसल्याने सगळ्यांच्या थोड्या थोड्या अस्थी कलशात एकत्र करून दिल्या जातील.

fghj