एक दिवसीय राज्यव्यापी आंदोलन ; शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे!
Jan 18, 2024, 19:57 IST
बुलडाणा : (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : शेतकऱ्यांच्या विविध मागण्या संदर्भात आज १८ जानेवारीला राज्यभरात एकदिवसीय धरणे आंदोलन होत आहे. स्वतंत्र भारत पक्षाच्या नेतृत्वात शेतकरी संघटनेने बुलडाण्यात आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडून आंदोलकांनी निदर्शने केली.
शेतमालावरील निर्यातबंदी कायमस्वरूपी उठवावी,सक्तीची कर्जवसुली बंद करावी,शेतीसाठी पूर्ण वेळ वीज द्यावी, वण्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, विम्याचा योग्य लाभ मिळावा यासाठी योजना आखावी तसेच अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई मिळावी अश्या प्रमुख मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. सविस्तर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आले. सदर निवेदनावर विलास मुजमुले, आत्माराम तायडे, गणेश घूबे, दत्तात्रय घुबे, अर्जुन जाधव, दामोधर शर्मा, नामदेवराव जाधव यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.