कमर्शियल पायलट दांडगे यांचा वन बुलढाणा मिशनकडून गौरव! संदीप शेळके म्हणाले, वैमानिक रवी दांडगे यांचा संघर्ष प्रेरणादायी..

 
Ss
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):अत्यंत प्रतिकूल परिस्थिती आणि सोयीसुविधांचा अभाव असतांना रवी दांडगे यांनी पायलट होण्याचे स्वप्न पूर्ण केले. परिस्थिती कशीही असली तरी ध्येयापासून हटले नाही. वेळप्रसंगी मिळेल ती कामे केली. त्यांचा संघर्ष युवकांना प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन राजर्षी शाहू परिवाराचे अध्यक्ष संदीप शेळके यांनी केले. 
चिखली येथील रवी दांडगे यांना कमर्शियल पायलटचे लायसन्स मिळाल्याबद्दल वन बुलडाणा मिशनच्या कार्यालयात १७ ऑगस्ट रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भरत पडघान, भारत तेजनकर, गजानन सावळे, अरुण गायकवाड, गजानन वरपे, विजय खेडेकर, शिवा साळोक, रामदास सपकाळ, विजय महाजन, संदीप बांबल, काशिनाथ शेळके, उमेश इंगळे, मोहन काळे, अमोल जवंजाळ, राम अंभोरे, गणेश मोळवंडे, संतोष उबरहंडे, अमोल काकडे, ओम गायकवाड, प्रदीप जगताप, ऋषी तेजनकर यांची उपस्थिती होती. 
पुढे बोलतांना संदीप शेळके म्हणाले, युवकांमध्ये प्रचंड ऊर्जा आणि क्षमता आहे. युवक हे उद्याचे देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यांची ऊर्जा सकारात्मक कामासाठी वापरल्यास चांगले परिणाम समोर येतात. रवी दांडगे यांनी संघर्षातून यश मिळवले आहे. पुणे, मुंबई सारख्या शहरात जाण्याऐवजी चिखलीत राहून त्यांनी ध्येय गाठले. चिखलीकरांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. कार्यक्रमाचे संचलन शाम गायकवाड यांनी केले. विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.