महाराष्ट्र पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त मलकापूर ग्रामीणच्या ५१ पोलिसांनी केलं चांगल काम! वाचा ....

 
Jdnd
मलकापूर(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) महाराष्ट्र पोलीस दलाचा वर्धापन दिन आज २ जानेवारी रोजी सर्वत्र साजरा करण्यात झाला. पोलीस वर्धापन दिनाच्या निमित्ताने पोलीस विभागाचे वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. मलकापूर ग्रामीण पोलिसांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकूण ५१ पोलिस कर्मचाऱ्यांची रक्तदान केले. विशेष म्हणजे आजच्या रक्त संकलनातील १० पिशव्या रुग्णांना उपचाराकरिता देण्यात आल्या आहेत.
Bxbx
'सदरक्षणाय खलनिग्रहणाय' हे ब्रीद जपणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलिसांना त्यांच्या कामासाठी आज सलाम दिला जातो. जिल्ह्यात पोलिसांच्या आयोजनातून रक्तदान शिबिर संपन्न झाले. मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी देशसेवेचा अनोखा प्रत्यय दाखवून दिला. याप्रसंगी डॉ कोलते व उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी, पशुवैद्य डॉ कापसे, यांनी शिबिराला भेट दिली. शिबिराच्या आयोजनामध्ये ठाणेदार संदीप काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राठोड, यांच्यासह मलकापूर ग्रामीण पोलीस कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.