शिवसेना संपर्कप्रमुख प्रा.नरेंद्र खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या चिखलीत भव्य शंकरपटाचे आयोजन! दोन लाख एक्कावन्न हजारांची होणार जंगी लूट! सहभागी होण्याचे आवाहन

 
चिखली(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा: चिखली:): शिवसेना (उ.बा.ठा) गटाचे संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या रविवार(दि.२४ डिसेंबर) रोजी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. चिखली शहरातील जालना रोड, रेणुकामाता शेत परिसरात शंकरपटाचे नियोजन आहे. याप्रसंगी ०२ लाख ५१ हजार ची जंगी लूट करण्यात करण्यात येईल. त्यामध्ये प्रथम विजेत्यास ५१ तर द्वितीय क्रमांकाच्या स्पर्धकाला ३१ हजारांचे रोख पारितोषिक देण्यात येईल.
Nk
                        जाहिरात 👆
दरम्यान शंकरपटाचे उद्घाटन सत्कारमूर्ती शिवसेना नेते प्रा. खेडेकर यांच्या हस्ते होईल.शंकरपट स्पर्धा पुढील दोन दिवसात चालणार असून समारोप सोमवार, २५ डिसेंबरला होईल. त्यानंतर बक्षीस वितरणाच्या समारंभात शिवसेना (उ.बा.टा.)गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, उपजिल्हाप्रमुख कपिल खेडेकर तसेच रेणुका माता संस्थानचे सचिन बोंद्रे,गोपाल शेटे, उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमूख उपस्थितीत किसानसेनेचे वसंतराव झालटे,युवासेनेचे नंदू कऱ्हाडे, तालुकाप्रमूख गजू पवार, शहरप्रमुख श्रीराम झोरे,किसन पाटील, अंकुश लेंभे हजर असतील. भव्य शंकरपटाचे आयोजन किसनराव धोंडगे, अरुण अंबास्कर,विलास सुरडकर, विष्णू मुरकुटे, कौतिकराव जाधव, संतोष काळे, संजू तरमळे, यांच्यावतीने करण्यात आले आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन शुभम म्हस्के यांनी केले आहे.