आंदोलनाच्या दहाव्या दिवशी सरकारचा दशक्रिया विधी! बुलडाण्यात कोळी महादेव समाजाचे आंदोलक ढसाढसा रडले, म्हणाले मेलेल्या सरकारच करायचं काय रे बापा आता...

 
Kkd
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : आरक्षणासह अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र मिळावे. या प्रमुख मागणीसाठी २ जानेवारी पासून बुलडाण्यात महादेव कोळी समाजाचे विविध प्रकारचे आंदोलन सुरू आहे. याच मालिकेत आज ११ जानेवारीला दुपारी "सरकारचा दशक्रिया विधी" असे अनोखे आंदोलन पार पडले.आमच्या मागणीकडे सरकार दुर्लक्ष करतंय, आंदोलनाची दखल घेत नसल्याने सरकार मेलेल जाणवत असल्याचे आंदोलकांनी म्हटले आहे..यावेळी सरकार मेलं अस म्हणून महिला आंदोलक देखील रडल्या.. व दोन पुरुष आंदोलकांनी दशक्रिया विधीत मुंडण केले.
Rama
                        जाहिरात 👆
गणेश इंगळे, विजय बामंदे या आंदोलकांनी मुंडन करून सरकारवर शोक व्यक्त केला.यापूर्वी ९ जानेवारीला दोन आंदोलकांनी येथील बीएसएनएल टॉवरवर चडले, रस्ता रोखला सरकार विरोधी जोरदार निदर्शने केली होती. यापुढे देखील उग्र स्वरूपाचे आंदोलन करणारं असल्याचे आंदोलकांनी सांगितले. आंदोलनाचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. मलकापूरात देखील आज रास्ता रोखण्यात आला.त्यांनतर सर्व आंदोलक बुलडाणा येथील आंदोलनात सहभाग घेतला.