धर्मवीर संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मातृतीर्थ बुलडाणा विभागाच्या वतीने गावोगावी मुकपदयात्रा!

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान मातृतीर्थ बुलढाणा विभागाच्या वतीने गावोगावी मुकपद यात्रा काढण्यात आली. यावेळी धर्मवीर संभाजी महाराज यांचे समाधी क्षेत्र वढू बु येथून धर्मवीर ज्वाला आणण्यात आली होती. फाल्गुन अमावास्येपर्यंत (काल ८ एप्रिल पर्यंत) दररोज ठिकठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले. 

छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदानाची आठवण म्हणून श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानतर्फे धर्मवीर बलिदान मास पाळला जातो. यामध्ये महिनाभर चप्पल न घालणे, गोड पदार्थ वर्ज करणे, चहा बंद करणे, सुखाच्या कार्यक्रमात सहभागी न होणे, मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन न करणे आदी गोष्टी पाळण्यात येतात. याचाच एक भाग म्हणून गावोगावी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस सामूहिक अभिवादन करण्यात आले. प्रेरणामंत्राने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या महिन्यामध्ये सर्व धारकरी आपली एक आवडत्या वस्तूचा त्याग करतात शु.प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्या असा एक महिन्याचा काळ हा सुतकाचा काळ म्हणून धारकरी पाळत असतात. ठीक ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करतात. शेवटच्या दिवशी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी श्री क्षेत्र वढू बू येथून धर्मवीर ज्वाला आण्यात आली व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची न निघालेली अंतयात्रा ही मुकपद यात्रेच्या स्वरूपात काढण्यात आली ,यावेळी जिल्हा प्रमुख धारकरी सागर चव्हाण,संतोष सोनुने,शंकर थुट्टे,अंकेश मुठ्ठे,पवन वाघ,निलेश मुठ्ठे,सूरज बावस्कर,सुनील मते,शुभम मावळे, मयूर राऊत ,योगेश तायडे,आदित्य टेकाळे , अमोल तांगडे,सचिन शेळके व सर्व धारकरी तथा शिवभक्त उपस्थित होते.