अरेच्चा हे तर अतीच झालं! चोरट्यांनी पेट्रोल पंपावरून चक्क ट्रक पळवला; मेहकरची घटना!

 
jgjgj
मेहकर(अनिल मंजुळकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात छोट्या मोठ्या चोरीच्या घटना नवीन नाहीत. मात्र मेहकरात एक अजबच चोरीची घटना समोर आली आहे. पेट्रोल पंपावर उभा केलेला ट्रक चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार समोर आलाय. मेहकर डोणगाव रोडवरील वरद पेट्रोलपंपावर हा प्रकार समोर आलाय...!
 

मेहकर येथील फैजल शाह अयाज शाह यांचा अशोक लेलँड कंपनीचा १४ टायर ट्रक एम एच ३०, एव्ही ११३४ हा मेहकर डोणगाव रोडवरील वरद पेट्रोलपंपावर  लावण्यात आला होता.  २४ ऑक्टोबरच्या रात्री कारमधून आलेल्या अज्ञात चोरट्यांनी  हा ट्रक घेऊन पोबारा केला. हा प्रकार सीसीटिव्ही मध्ये कैद झाला आहे. या ट्रकची किंमत २० लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. दरम्यान या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.