अरे देवा! घोर कलियुग; मे महिन्यातल्या १९ दिवसांत जिल्ह्यातून ३३ जणी गायब! काही बिना लग्नाच्या तर काही लग्न झालेल्याही हरवल्या! चिखलीची साक्षी, नांदूऱ्याची सुजाता, खामगावची अंजली आहेत कुठे?

 
missing
बुलडाणा( बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात मुलींच्या बेपत्ता होण्याचा मुद्दा चांगलाच गाजतोय. बुलडाणा जिल्ह्यात तर ही संख्या अधिक आहे, अल्पवयीन मुलींचे अपहरण,त्यातून जबरदस्ती शारीरिक संबंध अशा घटनाही कमी नाहीत. मात्र तशा घटनांत पोलीस वेगाने तपास करतात मात्र १८ वरील मुलगी बेपत्ता झाल्याचं पोलीस त्याला फारसे गांभीर्याने घेत नाहीत, अर्थात त्याला कारणही तसेच असते. बेपत्ता होणाऱ्या बहुतांश मुली किंवा महिला स्वतःच्या मर्जीने घर सोडून जातात असाच पोलिसांचा नेहमीचा अनुभव आहे. चालू मे महिन्यात जिल्ह्यातील ३३ मुली आणि महिला बेपत्ता झाल्याच्या  घटना समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे यात काही विवाहित सुद्धा आहेत.
 

लगिनसराईत घटना वाढतात..!

दरवर्षी लगीन सराई सुरू झाली की मुली किंवा महिला बेपत्ता होण्याची संख्या लक्षणीय रित्या वाढते. तिचे वय सज्ञान असल्याने पोलीस केवळ बेपत्ता झाल्याची नोंद करतात. कारण तिचा शोध लावल्यावर सुद्धा पुढे काय याची कल्पना पोलिसांना आलेली असते. मात्र मुलगी अल्पवयीन असली तर मात्र पोलीस अपहरणाचा गुन्हा दाखल करून तातडीने प्रकरण तपासावर घेतात. अनेकदा अल्पवयीन मुली देखील स्वतःच्या मर्जीने प्रियकरासोबत जातात, त्यांना सगळ कळत असल तरी कायद्याच्या दृष्टिकोनातून त्या अज्ञान असतात त्यामुळे अशा  वेळी पोलीस अल्पवयीन मुलीच्या आईवडिलांची तक्रार ग्राह्य धरतात.

जिल्ह्यात ३३ जणी गायब..!

दरम्यान १ मे ते १९ मे या १९ दिवसांत जिल्ह्यातून ३३ जणी गायब झाल्या आहेत. तशी नोंद जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात आहे. दुर्गा छगन जाधव (२३, रा बोरखेड, ता बुलडाणा), सौ
 गायत्री देवल्य अंबरे (२८) पिंपरी आडगाव ता.संग्रामपूर, प्रीती गजानन सोनुने(२२) हनुमान चौक नांदुरा, पूनम संजय इंगळे (१८) बेलगाव ता.मेहकर, आरती धर्मदेव तिजारे ( १९) जळगाव जामोद,  सौ वैशाली मुळे (२७) मेहकर, सौ. लता गणेश पोफळे (२६) लोणार, मुक्ता भानुदास झालटे(१९) नांदुरा,  कोमल सुनील महल्ले(२२) शेगाव, अर्चना सचिन तांबट(२०) मंगरूळ नवघरे,  वैशाली रामदास कदम (१९) मिलिंद नगर बुलडाणा, सौ मोहिनी अरुण लहाणे (३२) लोणार, अंजली प्रमोद सूरवाडे ( १८) बोरी, ता.खामगाव, अंकिता आनंदस्वामी नांद्रेकर( २६) विश्वास नगर बुलडाणा, सौ मनीषा नारायण इंगळे(४०) माकोडी, सौ पूजा विजय कळस्कर ( २४) सुटाळा, खामगाव,  गीता अशोक बजाडे ( २१) पळशी,ता.संग्रामपूर, साक्षी समाधान सुरडकर ( १८) चिखली, सुजाता रमेश इंगळे(१९) सानपुडी, ता नांदुरा यांच्यासह ३३ जणी गायब आहेत.