मातृतीर्थ सिंदखेराजात आज ओबीसींचा मोर्चा! काय आहेत मागण्या आणि कसा असेल मोर्चाचा मार्ग बातमीत वाचा...

 
L
सिंदखेडराजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): ओबीसी आरक्षण बचाव समिती सिंदखेड राजा मतदार संघाच्या वतीने ओबीसी समाजाचे आरक्षण वाचवण्यासाठी आज, १६ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० वा. मातृतीर्थ शहरात ऐतिहासिक मोर्चा होणार आहे.
या मोर्चासाठी मतदार संघातील व्यावसायिक, शेतकरी बांधव, शाळकरी मुलं, महिला यांच्यासह ओबीसी बांधव मोठ्या प्रमाणात सहभागी होणार असल्याचा दावा आयोजकांकडून करण्यात आलाय.
महाराष्ट्रात गेल्या अनेक दिवसांपासून आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाच्या वतीने ओबीसी समाजात आरक्षणाची द्यावयाची मागणी होत आहे. मराठा समाजाला  आरक्षण द्यावे पण ओबीसीमध्ये नको, कारण ओबीसी समाजाचे प्रचंड आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय नुकसान होणार असल्याने मराठा समाजाला आरक्षण ओबीसीमध्ये नको, यासह विविध मागण्यांसाठी सिंदखेडराजा मतदार संघाच्या वतीने सर्व ओबीसी बांधवांच्यावतीने हा मोर्चा आज सकाळी जिजामाता जन्मस्थाना समोरून सुरु होऊन शहरातील जिजामाता रोड, त्रिगुणी गल्ली, माणिक चौक, आढाव गल्ली, बालाजी गल्ली मार्गे बसस्थानक परिसरात पोहचून तेथून मोर्चाचा समारोप उपविभागीय कार्यालया समोरील संत सावता भवन प्रांगणात होणार आहे, असे आयोजकांनी कळवले आहे.