बेरोजगार तरुणांच्या कामाची बातमी! शुक्रवारी बुलडाण्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन; नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी मुलाखत घेणार अन् देणार हाताला काम; नोंदणी कशी करायची,अर्ज कसा करायचा? वाचा बातमीत...

 
Bdbxn
बुलडाणा( जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यातील युवकांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर आणि सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटीतर्फे शुक्रवार, दि. 13 ऑक्टोबर 2023 रोजी रोजगार मेळावा घेण्यात येणार आहे.
या रोजगार मेळाव्यासाठी इच्छुकांनी सहयोग मल्टिस्टेट क्रेडिट को-ऑपरेटीव्ह सोसायटी, जतकर कॉम्प्लेक्स, पाटबंधारे ऑफिससमोर, संगम चौक बुलढाणा येथे उपस्थित राहावे. रोजगार मेळाव्यामध्ये नामांकित उद्योजकांनी त्यांच्याकडील रिक्त पदे अधिसूचित केली आहे. सदर कार्यालयाकडे नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याद्वारे नामांकीत कंपनी प्रतिनिधीद्वारे गरजू आणि रोजगार इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन प्राथमिक निवड करण्यात येणार आहे.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, तथा मॉडेल करीयर सेंटरच्या rojgar.mahaswayam.gov.in आणि ncs.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी केलेल्या दहावी, बारावी, पदवीधर पुरुष, महिला उमेदवारांना प्रत्यक्ष उपस्थित राहून रोजगार प्राप्त करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी कार्यालयात येण्याची गरज नाही.
इच्छुक उमेदवार शैक्षणिक पात्रतेच्या आधारे एकापेक्षा जास्त पदासाठी अर्ज करु शकतो. उमेदवारांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह सकाळी १० वाजता स्वखर्चाने उपस्थित राहून नाव नोंदणी करावी आणि उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधीसमवेत मुलाखत द्यावी. जिल्ह्यातील उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. याबाबत काही अडचण आल्यास या कार्यालयाचा दुरध्वनी क्र. 07262 - 242342 तसेच कार्यालयातील योगेश लांडकर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7447473585 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटरचे सहायक आयुक्त प्र. वा. खंडारे यांनी केले आहे.